संकष्टी चतुर्थी निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करत खास करा आजचा दिवस!

WhatsApp Group

संकष्ट चतुर्थी ही सर्वांसाठीच खास असते. दर महिन्याच्या चतुर्थीला गणपतीची खास पूजाअर्चा केली जाते आणि बाप्पासाठी उपवास ठेवला जातो. आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपली मेहनत आणि बाप्पाची कृपा यामुळेच हे झालं आहे असा अनेकांचा समज असतो आणि त्यासाठीच हा उपवास करण्यात येतो. अशा या पवित्र संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा खास तुमच्यासाठी.

1. कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!

3. आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!

4. संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

5. संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

6. सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

8. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय पाहून उपवास सोडला जातो. गणरायाची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून संकष्टी साजरी करण्यात येते. संकष्टीच्या शुभेच्छा या दिवशी दिल्या जातात. काही जणांना संकष्टी आहे हे कधी कधी लक्षात राहात नाही अशावेळीही अगदी आदल्या दिवशीपासून वेगवेगळ्या शुभेच्छांच्या इमेज व्हायरल होताना दिसतात. अशाच काही शुभेच्छा.

1. भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

2. पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस – संकष्टी चतुर्थी बनवा खास

3. श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

4. मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

5. आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!

6. गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया! – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

7. वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थी बनवा खास

8. ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही – संकष्टीच्या शुभेच्छा!