
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला Sanju Samson आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्याने आतापर्यंत केवळ 22 सामने खेळले आहेत आणि प्रथमच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार खेळी खेळली आणि तीन झेलही घेतले.
उजव्या हाताचा फलंदाज संजू सॅमसनने 39 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राइकरेट 110.26 होता. तो नाबाद परतला आणि षटकार मारून सामना संपवला. त्याने तीन झेलही घेतले. यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात सॅमसन योग्य यष्टिरक्षक फलंदाजाप्रमाणे खेळला. त्याला मॅच फिनिशरची भूमिकाही देण्यात आली होती.
Sanju Samson is adjudged Player of the Match for his match winning knock of 43* as India win by 5 wickets.
Scorecard – https://t.co/6G5iy3rRFu #ZIMvIND pic.twitter.com/Bv8znhTJSM
— BCCI (@BCCI) August 20, 2022
सामन्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, “तुम्ही मैदानावर जितका जास्त वेळ घालवाल तितके चांगले वाटेल. देशासाठी असे करणे आणखी खास आहे. मी तीन झेल घेतले, पण स्टंपिंग चुकले. खरेतर कीपिंगचा आनंद लुटला. आणि फलंदाजीही. मला वाटते की भारतीय गोलंदाज खरोखरच चांगली गोलंदाजी करत होते, बरेच चेंडू माझ्याकडे आले.