आता IPL मध्ये दिसणार 2 नवे संघ, BCCI ची मोठी घोषणा!

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2022 साठी आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची भर घातली आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 8 संघाऐवजी आपल्याला 10 संघ आयपीएल खेळताना दिसतील.

संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी समूहाने लखनऊ तर CVC कॅपिटलने अहमदाबाद संघ खरेदी केला आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या 2 टीम वाढल्यामुळे अनेक नव्या युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये चमकण्याती संधी मिळणार आहे.

तब्बल 7090 कोटी रुपयांची बोली लावली आरपी संजीव गोयंका आरपीएसजी समूहाने लखनऊ हा संघ घेतला. तर सीव्हीसी कॅपिटलने 5625 कोटी रुपयांची बोली अहमदाबाद संघ आपल्या नावे केला. भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी नव्या दोन्ही आयपीएल संघमालकांचे अभिनंदन केलं आहे.

2022 च्या आयपीएल सत्रात हे दोन नवे संघ सहभागी होतील अशी घोषणा बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे आता 8 ऐवजी 10 संघांमध्ये आयपीएलचा रणसंग्राम रंगणार आहे. आयपीएलमध्ये यापूर्वी 10 संघ खेळले आहेत.

आयपीएल २०२२ मध्ये लखनऊचा संघ उत्तर प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करेल तर अहमदाबाद हा संघ गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. यापूर्वी गुजरातसाठी गुजरात लायन्स हा संघ आयपीएलमध्ये खेळला आहे.