‘अब सभी को सभी से खतरा हैं..’; संजय राउतांचे ट्वीट चर्चेत

WhatsApp Group

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावत आहेत. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये संजय राऊत खुर्चीवर बसलेले आहेत तर त्यांच्या शेजारीच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोला राऊतांनी कॅप्शनही दिलं आहे. यातून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं.. असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. आपल्या या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या दोघांनाही टॅग केळे आहे. यावरुनच हा या दोघांना आणि बंडखोर आमदारांनाही टोला आहे. यासोबतच संजय राऊतांनी यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रियांका गांधी यांना देखील टॅग केलं आहे.