गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, घरचे दरवाजे उघडे आहेत..;संजय राऊतांची आमदारांना साद

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा आमदारांना साद घातली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आमदारांना भावनिक साद (Sanjay Raut’s Appeal to Shiv Sena) घातली आहे. ही साद घालताना त्यांनी म्हटले आहे की, चर्चेतून मार्ग निघू शकतो. घरचे दरवाजे उघडे आहेत..का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी दुपारीच एक विधान केले होते. ज्यामुळे महाविकासआघाडीतही चलबिचल निर्माण झाली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून आमदारांना अवाहन केले आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये नेमके चाललेय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.