राज्यपाल-कोर्टाने बंडखोर आमदारांना बळ दिले, संजय राऊतांचं मोठं विधान

WhatsApp Group

मुंबई – बंडखोर आमदार उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले आणि त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिलं, असा आरोपच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी पुकारून भाजपसोबत आता सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना पुरती घायाळ झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.यावेळी त्यांनी राज्यपाल आणि सुप्रीम कोर्टावरही निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून जिंकून आले आहेत व त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिलं, असा आरोपच राऊत यांनी केला.

जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसे न करणाऱ्यांना कायद्याने बाद केले पाहिजे व पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र राज्यात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले आणि राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे ‘पेढे’ खाल्ले, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राज्यपालांवर केली.