समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातावर उद्धव गटाचे खासदार आणि प्रवक्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले, “हे सरकार जबाबदारी घेत नाही. हा समृद्धी महामार्ग जनतेसाठी नसून, कंत्राटदार आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनसाठी आहे.
समृद्धी महामार्ग महामार्ग हा मुळात चुकीच्या पद्धतीने निर्माण केला आहे. हा महामार्ग निर्माण करताना जनतेच्या सुरक्षापेक्षा ठेकेदारांचं हित जपण्यात आलं आहे. समृद्धी महामार्ग बनवत असताना शेतकरी, लहान उद्योजक यांचं हित पहिलं गेलं नाही. लोकांच्या जमिनी ओरबाडून घेण्यात आल्या. फळबाग, रस्त्यावरील उद्योग उध्वस्त करण्यात आले. त्या लोकांचे हे शाप आहेत, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
Deepika Padukone चा ‘Singham Again’मधील नवा लूक आला समोर
समृद्धी द्रुतगती मार्गावर वैजापूर परिसरात अपघात झाला
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे वेगात येणाऱ्या मिनी बसने कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील एक्स्प्रेस वेच्या वैजापूर परिसरात सकाळी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. हे ठिकाण मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बसने कंटेनरला मागून धडक दिली.
रोहित शर्माने केला मोठा विक्रम, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी पाहतच राहिले
या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये 5 पुरुष, 6 महिला आणि 1 अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. अधिका-याने सांगितले की, इतर 23 प्रवासी जखमी झाले असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवासी मंदिरात दर्शनासाठी गेले होते
अपघातातील जखमी हे मंदिरात दर्शनासाठी गेले होते, असे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. 23 जखमींवर वैजापूर व संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावरील जांबर गाव टोल नाक्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.