मुंबई – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशा कॅप्शनसह बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचे एक व्यंगचित्र ट्वीट केले होते. मात्र पूनन महाजन आणि भाजपने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर संजय राऊतांनी हे ट्वीट डिलीट केलं आहे.
संजय राऊतांच्या या ट्वीटला उत्तर देताना पूनन महाजन म्हणाल्या की, “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.”
संजय राऊतांने ट्वीट केलेल्या व्यंगचित्रावरुन राज्यात मोठा गदारोळ माजला होता. मात्र नंतर हे ट्वीट राऊत यांनी डिलीट करत म्हटलंय की, “हे व्यंगचित्र आर के लक्ष्मण यांनी काढलं होतं, त्यात अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी प्रमोद महाजनांवर वैयक्तिक टीका केली नाही.”