मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अटकेनंतर आता संजय राऊतांना ईडीकडून समन्स

WhatsApp Group

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, राऊत चौकशीला अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने ईडीकडे मुदतवाढीचा अर्ज केला होता. नंतर १ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स जारी केले होते. त्यानुसार कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांची तब्बल १० तास ईडीने चौकशी करण्यात आली होती. आता संजय राऊत यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे.