”ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं, भाग सोमैया भाग”; राऊतांचा सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा

WhatsApp Group

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले होते. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या वर्गणीचे पैसे लुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्याबाबत चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले होते.

ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने समन्स बजावल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या पोलीस स्थानकामध्ये हजर राहिले नाही.यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा ट्वीट करत निशाणा साधला आहे.

सोमैया बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमैया भाग!! अशा शब्दांत संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये अटकेची शक्यता असल्यामुळे सोमय्या पिता-पुत्र दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सोमवारी, ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.