
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे दिली जाऊ शकतात. संजय राऊत आज जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे वृत्त आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांना आता आर्थर रोड कारागृहात नेण्यात येणार आहे.
#UPDATE | Mumbai: Shiv Sena MP Sanjay Raut sent to judicial custody till 22nd August in connection with Patra Chawl land case https://t.co/J36zzqgYi4
— ANI (@ANI) August 8, 2022
न्यायालयाने गुरुवारी राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. उपनगरातील गोरेगाव येथील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. आता आज मुंबईतील विशेष न्यायालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळ (रो हाऊस) च्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. ईडीने म्हटले होते की, तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की शेजारच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राऊत यांनी मालमत्ता खरेदीमध्ये महत्त्वपूर्ण रोख व्यवहार केले होते. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 1.08 कोटी रुपये सापडल्याचा दावा तपास यंत्रणेने केला होता.