Patra Chawl Land Scam : शिवसेना खासदार संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

WhatsApp Group

Patra Chawl Land Scam : पत्रा चाळ जमीन घोटाळा मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडीची कोठडी आज संपल्यानंतर, त्यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या बाजूने जामीन मागितला होता. मात्र न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. ईडी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना प्रथम 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.

गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना विशेष न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर त्यांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार राऊत यांना आता पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण पत्रा चाळ जमीन खरेदीशी संबंधित आहे. 1,039 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या पत्नी आणि जवळच्या नातेवाईकांची 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.