Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत ईडीच्या ताब्यात

WhatsApp Group

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. मुंबईतील जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर काही तासांनंतर त्यांना ताब्यात घेतले आहे.

संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.

संजय राऊत यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्याविरोधात निर्लज्जपणे षडयंत्र रचले जात असून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाकरे पुढे म्हणाले, आज संजय राऊत यांनाही अटकही होऊ शकते.