”कोणीही समोर येऊ द्या, शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे” – संजय राऊत 

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसेच, महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले, आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तीक असतं. पण जर पाणी डोक्यावरून जात असेल, तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागणार. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच,  कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरं जाण्यासाठी तयार आहे. कोणीही समोर येऊ द्या. शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे, हे पाठीमागचे वार आमच्याकडे चालत नाहीत.आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत.

आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं ही आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही.” असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.