मी नारायण राणेंना मानतो कारण ते…; संजय राऊतांचं वक्तव्य

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिले आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असे आव्हान संजय राऊतांनी शिंदे गटाला दिले आहे. हे आव्हान देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे मात्र कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

संजय राऊत यांनी म्हटलं की, जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यामध्ये धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे 22 लोक फुटले त्यांनी राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.

तसेच जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे 54 आमदार असून द्या, राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत आम्हाला दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीमध्ये बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.