बंटी आणि बबली आले आहेत, त्यांना अजून मुंबईचं पाणी काय आहे हे माहीत नाही – संजय राऊत

WhatsApp Group

नागपूर – राणा दाम्पत्याला मुंबईत पोहोचू द्यायचे नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र, शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा मुंबईत पोहोचले आहेत. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्याचा उल्लेख त्यांनी सिनेमातील बंटी-बबली असा केला आहे.

कोणाला स्टंट करायचे आहेत तर करू द्या. ते लोक सिनेमातील आहेत. त्यांना अनुभव आहे. या स्टंटमुle काही फरक पडत नाही. त्यांना अजून मुंबईचे पाणी काय आहे, हे माहीत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत नागपुरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. त्यांना स्टंट करायचे आहेत, ते करू द्या. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालीसा वाचणे, रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकीचे आणि स्टंटचे विषय नाहीयत.

पण अलीकडेच भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट केले आहेत आणि त्यातील ही सर्व पात्रे आहेत. जनता यांच्या हिंदुत्वाला, यांच्या नाटकबाजीला गांभीर्याने घेत नाहीत. हनुमान चालीसा असेल, रामनवमी असेल किंवा इतर सण- उत्सव असतील, देशात, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्ही सगळे साजरे करतो, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, बंटी आणि बबली आले आहेत, तर आम्हाला काहीच हरकत नाही. ही स्टंटबाजी आहे. हे फिल्मी लोक आहेत. मार्केटिंग, स्टंटबाजी करणे हे त्यांचे कामचं आहे. भाजपला आपली मार्केटिंग करण्यासाठी अशा लोकांची गरज लागत असते. हिंदुत्वाचे मार्केटिंग करण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे हिंदुत्व काय आहे. आता कळेल मुंबई काय आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत.