‘….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’ – संजय राऊत

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी थेट अपक्ष आमदारांची नावेच जाहीर केली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, अपक्ष आमदारांच्या बाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातात जर दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) शिवसेनेला मतदान करतील. असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला सर्वकाही माहिती आहे. विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराजय झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असे होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सर्व वाहून गेलं असं होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राज्यस्थानमध्ये काँग्रेस जिंकली आहे. हरियाणात रडीचा डाव खेळून निवडणूक आयोग आणि भाजपने अजय माकन यांचा पराभव केला आहे. असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.