
मुंबई: राज्यात सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात लढत सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी संजय राऊतांबद्दल बोलताना त्यांना पुन्हा जेल मध्ये जायचंय का? असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता राऊतांनी देखील ट्वीट करत पुन्हा त्यांना उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना टॅग करत न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ? खोके देऊन त्यांना गुलाम केले आहे? हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका. असं ते म्हणाले आहेत. Dhananjay Munde Car Accident : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात, छातीला मार
संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय?
न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे ?
खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे?हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका. @Dev_Fadnavis pic.twitter.com/ksvez5HWa5— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2023
योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योगपतींना भेटायला आला तर त्या राज्याच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा आहे, ही आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एकदा गुजरातला भेट द्यावी, कारण आता बहुतांश उद्योग गुजरातमध्ये हलवले जात आहेत, असेही राऊत म्हणाले. असे असले तरी देशातील कोणत्याही राज्याच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा असेल तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब असेल.
प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावाचे स्वागत
आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावाबाबतही राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यास ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, असे राऊत म्हणाले. सध्याच्या युगात शिवशक्ती आणि भीमशक्ती येणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.