खोट्या गर्वाचे पक्षी जास्त फडफडतात, गरुडाच्या उड्डाणात कधीच आवाज येत नाही; संजय राऊतांचे ट्विट चर्चेत

मुंबई – राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका ट्विटची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेने महाराष्ट्रातून संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपला खोट्या अभिमानाचा पक्ष आणि शिवसेनेला उंच उडणारा पक्ष असे वर्णन केले आहे. त्यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 6 जागांसाठी आज निर्णय होणार आहे. यासाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह तीन उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी या तीन पक्षांनी (राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना) मिळून चार उमेदवार उभे केले आहेत.
झुठी शान के परिंदे ही
ज्यादा फडफडाते हैं…!
बाझ की उडान मे
कभी आवाज नही होती..!!
जय महाराष्ट्र..!!! pic.twitter.com/BpWAngwY2U— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेर लिहिला आहे. या शेरात भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला आहे. खोट्या गर्वाचे पक्षी जास्त फडफडतात, गरुडाच्या उड्डाणात कधीच आवाज येत नाही जय महाराष्ट्र..!!! असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.