मुंबई : राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाद सुरू होता. त्यांना हटवण्यासाठी विविध निदर्शने, धरणे, सभा, मोर्चे निघाले. महाराष्ट्र सरकारमध्येच फूट पडली. सर्व वादाच्या दरम्यान, 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला भेट दिली. त्याचवेळी राज्यपालांनी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हायचे असल्याचे सांगितले. त्यांनी राजीनामा पाठवला होता पण तो जवळपास महिनाभर प्रलंबित होता. भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जवळपास तीन वर्षे पूर्ण केली. त्यांच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्याबाबत बरीच चर्चा झाली असली तरी त्यांना राज्यपाल करण्यात आले नाही.
त्याचवेळी, कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या मंजुरीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, कोश्यारी यांनी राजभवनात भारतीय जनता पक्षाचे एजंट म्हणून काम केले आहे. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकारवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, कोश्यारी यांना हटवण्याची मागणी जवळपास वर्षभरापासून होत होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. राज्यातील जनता, राज्यातील राजकीय पक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनांनी मोर्चा काढून पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून राज्यपालांचा निषेध केला.
Changing the Governor isn’t a favour to Maharashtra, many Governors have been changed. It’s been a year since the people of Maharashtra were demanding a change of Governor because of his (BS Koshiyari) remarks on Shivaji Maharaj and Savitiribai Phule: Sanjay Raut pic.twitter.com/BftyfCpTJP
— ANI (@ANI) February 12, 2023
नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करणे अपेक्षित आहे – संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, कोश्यारी यांनी सरकारला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. तसेच मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी फेटाळल्या. त्यांनी फक्त भाजपचे एजंट म्हणून काम केले आहे. संजय राऊत म्हणाले, आता राज्याला नवा राज्यपाल मिळाला आहे. आम्ही नवीन राज्यपालांचे स्वागत करतो आणि ते संविधानानुसार काम करतील अशी आशा आहे. राजभवनाला भाजपचे कार्यालय बनवणार नाही.
महाराष्ट्रासह अन्य 13 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. त्याचबरोबर येथे नवीन नियुक्तीही करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी, सीपी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी, गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी आणि शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. .