संजय राऊत आणि रवि राणांच्या या फोटोची होतेय चर्चा

WhatsApp Group

मुंबई – राजकारणामध्ये शेवटपर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, आणि कोणीही कोणाचं मित्र नसतं हेच अनेकदा समजून आलंय. कारण, ज्या पक्षाविरुद्ध नेतेमंडळी जोरजोरात आणि मोठी टिका करतात. कालांतराने त्याच पक्षामध्ये ते दिसून येतात. आता, काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राणा यांच्यात चांगलाच वाद रंगला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात पुरणार, अशी भाषा केली होती. आता, तेच संजय राऊत आणि आमदार रवि राणा हे एकाच पंगतीमध्ये जेवताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून संजय राऊत, नवनीत राणा यांच्यासोबत एकूण ३० खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाख दौऱ्यावर आहेत.

त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्ताने दोघंही एकमेकांसमोर येणार का? आणि दोघांमध्ये काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यातच, आता रवि राणा आणि संजय राऊत यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत.