‘ऋषभ पंत कधीकधी बेजबाबदार फटके खेळून बाद होतो, पण…’, संजय मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

WhatsApp Group

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची प्रत्येकजण स्तुती करताना दिसत आहे. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही ऋषभ पंतवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की कधीकधी ऋषभ पंत बेजबाबदार फटके खेळून बाद होतो, पण जबाबदारी घेण्यास तो कमी पडत नाही.

ऋषभ पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या भारताच्या मधल्या फळीचा कणा बनू शकतात, असे क्रिकेटपटू-समालोचक संजय मांजरेकर यांनी सांगितले. ऋषभ पंत कधी कधी बेजबाबदार शॉट्स खेळून बाद होतो पण तो जबाबदारी घेण्यास मागे हटत नाही आणि ऋषभ पंतकडे वेगवेगळे शॉट्स खेळण्याचे कौशल्य आहे.

एका स्पोर्ट्स वेबसाइटशी केलेल्या संभाषणात संजय मांजरेकर यांनी सांगितले की, “इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने खेळलेली मॅच-विनिंग इनिंग त्याचे कौशल्य दाखवते. त्यामुळे जबाबदारीच्या दृष्टिकोनातून मला वाटते की हा खेळाडू अविश्वसनीय आहे.”

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतने नाबाद 125 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. पंतच्या या खेळीमुळे भारताने विजय मिळवला. त्यासोबतच तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. तब्बल 8 वर्षांनंतर भारतीय संघाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे.