भारताची दिग्गज महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ती म्हणाली की, २०२२ चा मोसम हा आपल्यासाठी अखेरचा हंगाम असेल. या मोसमानंतर तो टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभव झाल्यानंतर सानिया मिर्झाने ही माहिती दिली आहे.
Australian Open: Sania Mirza bows out in women’s doubles opener
Read @ANI Story | https://t.co/99IcPA5wyi#SaniaMirza pic.twitter.com/GkMUzResRI
— ANI Digital (@ani_digital) January 19, 2022
गेली अनेक वर्षे टेनिसमध्ये भारताचं नाव देश-विदेशात गाजवणारी सानिया मिर्झा या वेळी म्हणाली की, ‘हा माझा शेवटचा सीझन असेल, मी दर दिवशी पुढील सामन्यांसाठी तयारी करत असते, परंतु मी हा पूर्ण सीझन खेळेल की नाही याचीही मला खात्री नाही. आता माझे शरीर मला पहिल्यासारखी साथ देत नसल्याने मला हा निर्णय घ्यावा लागत आहे.’