Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा, ‘या’ दिवशी खेळणार शेवटचा सामना

WhatsApp Group

सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया मिर्झाने शनिवारी टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की दुबईतील WTA 1000 स्पर्धा ही तिची शेवटची स्पर्धा असेल. सानियाने महिला दुहेरीचे तीनदा ग्रँडस्लॅम आणि तीन वेळा मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या महिन्यात ती ऑस्ट्रेलिया ओपनच्या दुहेरीत खेळणार आहे.

सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शोएब मलिकपासून घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, दोघांकडून यावर काहीही वक्तव्य आलेलं नाही. त्यानंतर सानियाने शोएब मलिकसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. आता ती हैदराबाद आणि दुबईमध्ये अकादमी चालवणार असल्याचे बोलले जात आहे.

सानियाने हे पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले आहेत

सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण पुरस्कार (2016) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.  सानियाने आतापर्यंत 6 मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. तिने ऑस्ट्रेलियन ओपन (2016), विम्बल्डन (2015) आणि यूएस ओपन (2015) दुहेरीत विजेतेपद पटकावले आहेत. याशिवाय त्याने मिश्र दुहेरीत तीन ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि यूएस ओपन (2014) विजेतेपदेही जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)