के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज पहिल्या दिवशी पराभूत झालेल्या लातूर विजयनगारा विर्स व सांगली सिंध सोनिक्स या दोन संघाच्या आज सामना रंगला. दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत सुरुवात केली. पहिल्या दहा मिनिटात लातूर कडे ६-४ अशी नाममात्र आघाडी होती. सांगलीच्या यासिन आंबीच्या अष्टपैलू खेळांमुळे व वृषभ साळुंखेच्या चढायांनी लातूर संघाला ऑल आऊट केले.
मध्यंतराला 17-09 अशी आघाडी सांगली सिंध सोनिक्स संघाकडे होती. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा पवित्रा घेतला. शेवटची दहा मिनिट शिल्लक असताना 21-12 असा खेळ सुरू होता. लातूरच्या ऋषिकेश पांचाळ व सोहेल शेख यांच्या उत्कृष्ट खेळाने सामन्यांत चुरस वाढवली.
सांगलीच्या यासिन आंबीने चढाईत 3 गुण तर पकडीत 5 गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. त्याला वृषभ साळुंखेने 8 गुण मिळवत चांगली साथ दिली. सांगली संघाने 34-22 असा विजय मिळवत गुणतालिकेत खाता उघडलं. लातूर कडून ऋषिकेश पांचाळ ने 7 गुणांची खेळी केली.
बेस्ट रेडर- वृषभ साळुंखे, सांगली सिंध सोनिक्स
बेस्ट डिफेंडर- यासिन आंबी, सांगली सिंध सोनिक्स
कबड्डी का कमाल- ऋषिकेश पांचाळ, लातूर विजयनगारा विर्स