सांगली – सांगलीमध्ये (Sangli) एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांसह त्यांची आई, पत्नी आणि मुलं असे नऊ जणांचे मृतदेह (Sangli 9 people Dead) घरामध्ये संशयास्पद रित्या आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पाेलीसांनी सांगितले डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे , आई आक्काताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे तसेच राजधानी हॉटेल जवळ दुसऱ्या घरात डॉ माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत.
पोलिसांनी (Sangli Police) मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. या नऊ जणांनी सामुहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. या नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Suicide Case) केली आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
