MCA च्या निवडणुकीत शेलार-पवार पॅनलचा विजय, क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव

WhatsApp Group

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या (MCA) निवडणुकीत भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील (Sandip Patil ) यांचा अमोल काळे (Amol Kale) यांच्याकडून पराभव झाला आहे. भाजपचे आमदार आणि बीसीसीआयचे नवे कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि शरद पवार यांचा पाठिंबा असलेल्या अमोल काळे यांनी पाटील यांचा २५ मतांनी पराभव केला.

पाटील यांच्या 158 च्या तुलनेत काळे यांना 183 मते मिळाली. या पूर्वी अमोल काळे हे MCA चे उपाध्यक्ष होते. 66 वर्षीय माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी गेल्या महिन्यात एमसीएची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

पाटील यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक होते आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पाटील यांनी भारतासाठी 29 कसोटी आणि 45 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्यांनी भारत, केनिया आणि ओमान या संघांना प्रशिक्षणही दिलं आहे.