मुंबई – कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्य आर्थिक संकटात असताना दारू/ वाईन विक्री चालू करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. तेंव्हा संजय राऊत Sanjay Raut यांनी “वाईन,डाईन, फाईन,वा, राज बाबू” अश्या मथळ्याचा अग्रलेख लिहित राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती.
नुकताच राज्य सरकारने घेतेलेल्या वाईन विक्रीच्या नव्या निर्णयावरून Maharashtra govt allowing sale of wine at supermarkets मनसेने राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचा चांगला समाचार घेतला आहे.
करोना च्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022
मनसे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी एक ट्वीट करत लिहीले आहे की, “कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?”
राज्य आर्थिक संकटात असताना दारू/वाईन विक्री चालू करावी अशी मागणी @RajThackeray साहेबांनी केली होती…तेंव्हा वाचाळवीर @rautsanjay61 यांनी “वाईन,डाईन, फाईन,वा, राज बाबू” अश्या मथळ्याखाली अग्रलेख लिहित टीका केली होती.
आज तेच वाचाळवीर वाईन विक्रीचे ओरडून ओरडून समर्थन करतायत. #म pic.twitter.com/iBNCgjZYnP
— MNS Report | मनसे रिपोर्ट (@mnsreport9) January 28, 2022