‘सम्यक वॉरियर्स’ने जिंकला शिरशिंगे प्रिमिअर लीगचा खिताब

WhatsApp Group

तळकोकणातल्या सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावात विरवाडी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिरशिंगे प्रिमिअर लीग पर्व २ ची रविवारी सांगता झाली. या स्पर्धेत अनेक दिग्गज संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅंक संचालक रविंद्र मडगावकर आणि माजी जि.प.सदस्य पंढरी राऊळ यांच्या हस्ते झालं. उद्घाटनावेळी गावचे माजी सरपंच सुरेश शिर्के, उपसरपंच पांडुरंग राऊळ, जीवन लाड आदी मडंळी उपस्थित होती.

जाणून घ्या स्पर्धेतील विजयी संघ

 

सम्यक वॉरियर्स

शनिवार आणि रविवार असे २ दिवस चाललेल्या या स्पर्धेचे विजेतेपद सम्यक वॉरियर्स या संघाने आपल्या नावावर केलं. सम्यक वॉरियर्स शानदार खेळ दाखवत उपस्थित सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली

DVR स्पोर्ट्स

DVR स्पोर्ट्स संघाने शिरशिंगे प्रिमिअर लीग २ चे उपविजेते पटकावले

मराठा वॉरियर्स

शिरशिंगे प्रिमिअर लीग- २ स्पर्धेचं तृतीय पारितोषिक मराठा वॉरियर्सने जिंकलं

कलमेश्वर वॉरियर्स

कलमेश्वर वॉरियर्स संघाने मिळवलं चौथं स्थान

 

स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे

  • या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणारा गणेश परब ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला
  • विजय राऊळने जिंकली पर्पल कॅप!
  • उत्कृष्ट झेलचा मान दत्तप्रसाद राऊळला मिळाला
  • साईराज राऊळ ठरला अंतिम सामन्याचा सामनावीर!
  • सर्वोत्तम फलंदाज – सुमित परब
  • सर्वोत्तम गोलंदाज – सुरज सावंत

 

अधिक बातम्या वाचा 

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा!

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काने शेअर केली खास पोस्ट, काय लिहिले वाचा…