Sameer Wankhede Transferred: आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची अखेर महाराष्ट्राबाहेर बदली

Sameer Wankhede Transferred: कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिन चिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचलाक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसममध्ये बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीचे डीजी एस. एन. प्रधान यांनी दिली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार असे स्पष्ट झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांची महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.