“तेव्हाही, उद्याही आणि पुढेही समाजा बरोबर”, संभाजीराजेंचं आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन

WhatsApp Group

मुंबई – मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध मराठा संघटना आणि तरुणांचा पाठिंबा मिळत आहे तर हजारो तरुण मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. तर संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यामधून ५ हजार तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत.


संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईमध्ये जाणार आहे. मात्र, ज्यांना मुंबईत जाणे शक्य नाही ते औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेच अन्नत्याग आंदोलन करून संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.