
पुणे – खासदार संभाजीराजे भोसले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल यावर त्यांनी आता भाष्य केलं आहे.
विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते असं ते म्हणाले आहे. यावेळी राज्यसभेची निवणुक लढवणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी ते अपक्ष म्हणून लढणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी ‘स्वराज्य’ (Swarajya) या त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली आहे.