मुंबई: रायगड जिल्ह्यातील सांबरकुंड प्रकल्पाच्या प्रलंबित भूसंपादनासंदर्भातील अडचणी महसूल यंत्रणेने त्वरित सोडवून प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधानभवन येथील दालनात सांबरकुंड धरण प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलिबागला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सांबरकुंड हा महत्त्वाचा प्रकल्प असून प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मोबदला योग्य निकषांनुसार देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.