सलमानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चा ट्रेलर लाँच, पाहा व्हिडीओ

WhatsApp Group

मुंबई – सुपरस्टार सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाचा अ‍ॅक्शन-पॅक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर २०२१ ला पूर्ण जगात ‘अंतिम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सुमारे तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा सलमान खान हा शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतो. या चित्रपटात आयुष एका आक्रमक गँगस्टरची भूमिके दिसतो. सलमान आणि आयुष या दोघांनीही चित्रपटात भरदार शरीरयष्टीमध्ये दिसतात.

या चित्रपटात प्रज्ञा जैस्वाल आणि महिमा मकवाना याही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महिमा ही टीव्ही आणि वेब सिरीजमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटातूनच तिचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे.

मराठीमध्ये गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हे महेश मांजरेकर आहेत.