मुंबई – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात नुकताच मोठा दिलासा मिळाला आहे. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले होते. मात्र आता या सलमानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा फटका बसला आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेता सलमान खानला ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने अभिनेत्याला आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यासाठी समन्स बजावले आहे.
Mumbai | Andheri Magistrate Court summons Salman Khan to appear on April 5 in a 2019 case filed by a journalist Ashok Pandey for allegedly misbehaving with him. Court has summoned the actor for offences under IPC sections 504 and 506
— ANI (@ANI) March 22, 2022
पत्रकार अशोक पांडे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नोटीस बजावली आहे. आयपीसीच्या कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाने सलमान खानला पुढील महिन्यात ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय सलमान खानला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याला आयपीसीच्या कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्ह्यांसाठी समन्स बजावण्यात आले आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमान खानला ५ एप्रिल २०१९ रोजी पत्रकार अशोक पांडे यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या प्रकरणात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. न्यायालयाने अभिनेत्याला आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्ह्यासाठी समन्स बजावले आहे.