Salman Khan Birthday: भाईजानच्या वाढदिवसाला ‘किंग खान’ची हजेरी

WhatsApp Group

बॉलिवूड सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खानला बॉलिवूडमध्ये पंख पसरून 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजही त्याच्या स्टाईलचे करोडो लोक वेडे आहेत.

दरम्यान सलमानच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने त्याची भेट घेतली आहे. 57 व्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने एका पार्टीचे आयोजन केले होते. लेट नाईट पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावली. व्हिडिओमध्ये पाहू शकता की या दोघांचे पोशाख जवळपास सारखेच आहेत. दोघेही काळ्या रंगाचा शर्ट आणि गडद रंगाच्या जीन्समध्ये दिसत आहेत.

Happy Birthday Salman Khan: 75 रुपये होती पहिली कमाई, आज आहे करोडोंचा मालक; जाणून घ्या रंजक गोष्टी

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सलमान आणि शाहरुखची मैत्री आधी शत्रुत्वात बदलली, नंतर हळूहळू दोघे पुन्हा चांगले मित्र बनले. आर्यन खान प्रकरणादरम्यान सलमान शाहरुखसोबत दिसला होता. दोघेही एकमेकांच्या चित्रपटांना सपोर्ट करत असतात.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा