
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. वांद्रे पोलिसांनी (Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हे धमकीचे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सलमान खान ज्या ठिकाणी वॉकला जातो आणि ज्याठिकाणी ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र मिळाले आहे. यामुळे आता बॉलिवूड (Bollywood) विश्वास खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान याला मिळालेले धमकीचे पत्र त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. सलमान ज्या ठिकाणी वॉकला जातो, त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो, त्या बाकड्यावर मिळाले असल्याचं सांगण्यात येत आहे.