Bigg Boss 16: रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ च्या चाहत्यांसाठी हा आठवडा थोडा धक्कादायक होता. प्रथम श्रीजीता डे हीला शोमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अब्दु रोजिकने अचानक स्वेच्छेने एक्झिट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आणि आता साजिद खाननेही शोला निरोप दिला.
साजिद खान ‘बिग बॉस 16’मध्ये आपल्यापासून अनेक अभिनेत्रींकडून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले. ‘बिग बॉस’मध्ये त्याचे येणं हे अनेकांना आवडलं नाही. सुरुवातीपासूनच त्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली जात होती. अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यामुळे त्याला काम मिळणं ही बंद झालं होतं. आता तो ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाला आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडताना साजिद खानने घरातील त्याच्या प्रवासात त्याला साथ दिल्याबद्दल बिग बॉस आणि सर्व स्पर्धकांचे आभार मानले. यावेळी साजिदला देखील अश्रू अनावर झाले.
Bigg Boss ke ghar aur apne doston ko kaha Sajid ne alvida. 🥺
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9 baje, sirf #Colors par. #BB16 #BiggBoss@Beingsalmankhan@Shivthakare9 @TouqeerSumbul #MCStan #NimritKaurAhluwalia pic.twitter.com/VG7l4wbN5R
— Bigg Boss (@BiggBoss) January 15, 2023
पण साजिद आता एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. साजिद खान 4 वर्षांनंतर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचे नाव ‘100 परसेंट’ असं असून या चित्रपटात अनेक कलाकार असतील, सध्या शहनाज गिलचे नाव फायनल आहे. या चित्रपटाविषयी कोणतीही विशेष माहिती नाही, परंतु साजिदने एपिसोडमध्ये जाताना सांगितले आहे की तो लवकरच या चित्रपटाद्वारे लोकांसमोर येणार आहे.
