अभिनेत्री साई पल्लवीने काश्मिरी पंडितांबाबत केलं खळबळजनक वक्तव्य, नव्या वादाला सुरुवात

WhatsApp Group

दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक फॉलोअर अभिनेत्रींपैकी एक साई पल्लवी जिने गेल्या काही वर्षांत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने तमिळ, मल्याळम आणि तेलुगू अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे.

अभिनेत्रीच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त व्यवसाय केला आहे आणि बॉलिवूडचा मोठा दिग्दर्शक करण जोहर देखील तिचा मोठा चाहता आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक केले जात असले तरी तिच्या अलीकडच्या विधानामुळे तिच्यावर बरीच टीका होत आहे.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये साई पल्लवीने म्हटलं आहे की, ”माझ्या मते हिंसा हा संवादाचा चुकीचा मार्ग आहे.माझं कुटुंब हे एक तटस्थ भूमिका घेणारं कुटुंब आहे. त्यांनी मला फक्त चांगला माणूस बनण्यास शिकवलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचा हत्याकांड दाखवण्यात आलं आहे. तर हिंसा आणि धर्माचं मापदंड केलं गेलं, तर काही दिवसांपूर्वी एका गायीने भरलेला ट्र्क घेऊन जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत त्याला जय श्री राम म्हणायला सांगितलं. मग या दोन्हीं घटनांमध्ये काय फरक आहे’. अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

साई पल्लवीच्या या वक्तव्यानंतर साई पल्लवीला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. तर काही लोकांना तिचा बेधडकपणा पसंत पडत आहे. नेटकरी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.