SAFF Cup 2023: सुनील छेत्रीची हॅट्ट्रिक, टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-0 ने केला पराभव

0
WhatsApp Group

भारतीय फुटबॉल संघाने बुधवारी सॅफ कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर उभय संघांमधील सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने भारतासाठी अप्रतिम खेळ सादर केला. सुनील छेत्रीने हॅट्ट्रिक केली. तर उदांता सिंगने 1 गोल केला. भारतीय कर्णधाराने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. भारतासाठी उदांता सिंगने 81व्या मिनिटाला गोल केला. मात्र, उदांता सिंगला पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते.

भारतीय कर्णधाराने सुनील छेत्रीने 10व्या मिनिटाला पहिला गोल केला. 15व्या मिनिटाला पुन्हा त्याने दुसरा गोल केला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने 74व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी सामन्यातील हाफ टाईमच्या शिट्टीपूर्वी भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना भिडले. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली.

भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.