अभिनेता कमल हसनच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी!

WhatsApp Group

साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची प्रकृती खालावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कमल हसन यांना बुधवारी खूप ताप आला होता, त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचण्यांनंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, कमल हसन यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना 23 नोव्हेंबर 2022 रोजी वहेनई येथील श्री रामचंद्र मेडिकल सेंटर (SRMC) मध्ये दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हसन यांना काही दिवसांपासून खूप ताप येत होता आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी कमल हसन यांना दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update