आनंद शिंदे यांच्या पुतण्याचे दुःखद निधन

0
WhatsApp Group

प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे नातू आणि आनंद प्रल्हाद शिंदे यांचे पुतणे सार्थक दिनकर शिंदे यांचे आज दुःखद निधन झाले. नांदेडमध्ये सार्थक दिनकर शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सार्थक शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने म्युझिक इंडस्ट्रीला दु:ख झाले आहे. सार्थक शिंदे हे उत्कृष्ट तबलावादक होते. आज महाराष्ट्राने एक महान तबलावादक गमावला आहे.

या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सार्थक शिंदे यांनी अनेक भीम गाणी गायली, त्यांना ढोलकी वाजवण्याचीही आवड होती.