इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा 17 वा सीझन सुरू होण्यापूर्वीच प्रकाशझोतात आला आहे. IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावापूर्वीच अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे ही जगातील सर्वात महागडी टी-20 लीग चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्याने गुजरात सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतणे, रोहित शर्माच्या जागी हार्दिकची मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्ती ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. आता सचिन तेंडुलकरशी संबंधित एक बातमी सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवण्यात आल्याच्या निराशेतून क्रिकेट चाहते अद्याप सावरलेले नाहीत, अशीच सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरशी संबंधित एक बातमी ट्रेंड होत आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकरनेही मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडल्याचे वृत्त आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी ही बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हायरल झाली आहे. हार्दिक पंड्याला कर्णधार करताच अनफॉलो मुंबई इंडियन्स
🚨Breaking News🚨
Sachin Tendulkar stepped down from mentor role of Mumbai Indians.
RIP MUMBAI INDIANS pic.twitter.com/qKq17TQF60
— Shubham 𝕏 (@DankShubhum) December 16, 2023
Breaking News🚨
Sachin Tendulkar stepped down from mentor role of Mumbai Indians.
RIP MUMBAI INDIANS#MumbaiIndians pic.twitter.com/IxxboePiNI
— Suresh kumawat (@sureshgodawad) December 17, 2023
Breaking News🚨
Sachin Tendulkar stepped down from mentor role of Mumbai Indians.
RIP MUMBAI INDIANS#PAKvAUS #SupremeCourt#ShameOnMI #RohitSharma𓃵 #MumbaiIndians #MSDhoni #dunki #SalaarCeaseFire #RohitSharma #SalaarReleaseTrailer pic.twitter.com/k0qTlpQV8n
— Zara vibes ✨️ (@zaravibes303) December 17, 2023
सचिन तेंडुलकर मूळचा मुंबईचा असून तो आयपीएलच्या सुरुवातीपासून या संघाशी जोडला गेला आहे. या संघाचा आयकॉन खेळाडू असण्यासोबतच तो कर्णधारही होता. तेंडुलकरने 2009 ते 2011 दरम्यान मुंबईचे नेतृत्व केले. 2013 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन एक मार्गदर्शक म्हणून संघाशी जोडला गेला आहे. ”ज्याने शिकवलं त्याच्याच पाठीत वार केलास”, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते संतापले
केवळ सचिन तेंडुलकरच नाही तर त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे. अर्जुनला 2021 मध्ये मुंबईने करारबद्ध केले होते. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, सचिनच्या मुलाने 2023 मध्ये कोलकाताविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने या मोसमात 4 सामने खेळले आणि त्याला 3 विकेट घेता आल्या.