
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीमुळे देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.तो त्याच्या आयुष्यात काय करत आहेत याची माहिती सेक्रेटरी त्यांच्या चाहत्यांना देत असतात. अलीकडेच सचिन तेंडुलकरने त्याचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नात सचिन फेटा बांधताना दिसला होता. त्याने पगडी बांधतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सचिन त्याचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिश्मा हिच्या लग्नात पगडी बांधताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे. मी माझा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिश्मा हिच्या लग्नासाठी फेटा बांधलाय. लग्नात पारंपारिक लूकमध्ये दिसण्याची ही तयारी आहे. असं त्याने लिहीलं आहे. चाहत्यांना सचिनचा हा देसी लूक खूप आवडला आहे.
View this post on Instagram
त्याचवेळी या लग्नात सचिनची मुलगी सारा तेंडुलकरही पारंपारिक लूकमध्ये दिसली. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लग्नाचे काही फोटोही शेअर केले आहेत ज्यात ती हातात मेंदी लावताना दिसत आहे. सचिन तेंडुलकरला एकूण चार भावंडे आहेत. नितीन हा त्यापैकी मोठा भाऊ. त्यानंतर अजित तेंडुलकर आहे ज्यांना सचिन क्रिकेटमध्ये आणण्याचे संपूर्ण श्रेय देतो. त्याचबरोबर सचिनची एकुलती एक बहीण सविताताई तेंडुलकर आहे.