सचिन तेंडुलकरने मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा दमदार ट्रेलर केला लॉन्च

0
WhatsApp Group

श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन मंगळवारी त्याच्या बायोपिक चित्रपट ‘800’ चा अधिकृत ट्रेलर लाँच झाला आहे. महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरआणि श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांनी मुंबईत अधिकृत ट्रेलरचे अनावरण केले. मुरलीधरन या प्रसंगी म्हणाला, “मला खूप अभिमान आहे कारण त्यांनी (सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या) येऊन ट्रेलर लॉन्च केला. लोकांना हा चित्रपट आवडेल अशी आशा आहे.”

ऑस्कर विजेता चित्रपट स्लमडॉग मिलेनियर अभिनेता मधुर मित्तल त्याच्या बायोपिकमध्ये श्रीलंकेच्या महान फिरकी गोलंदाजाची भूमिका साकारताना दिसणार आहे. एमएस श्रीपाठी लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी तामिळ, हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होईल.