आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात, 5 वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदा खेळताना दिसला. अर्जुनने या सामन्यातील पहिले षटकही टाकले. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अर्जुनला त्याच्या आयपीएल पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या. तर सचिनने स्वतः अर्जुनच्या पदार्पणावर एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.
Arjun, today you have taken another important step in your journey as a cricketer. As your father, someone who loves you and is passionate about the game, I know you will continue to give the game the respect it deserves and the game will love you back. (1/2) pic.twitter.com/a0SVVW7EhT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
अर्जुन आयपीएल फ्रँचायझीसाठी खेळणारा पहिला मुलगा ठरला ज्याचे वडील सचिन तेंडुलकर यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. गोलंदाजीची सुरुवात करताना डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने पहिल्याच षटकात पाच धावा दिल्या. त्याने जगदीशनविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केले पण पंचांनी ते फेटाळून लावले. अर्जुनने या सामन्यात एकही विकेट न घेता 2 षटकात 17 धावा दिल्या.
सोशल मीडियावर अर्जुनसोबतचे दोन फोटो पोस्ट करताना सचिन तेंडुलकरने लिहिले की, अर्जुन, आज तू क्रिकेटर म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. हार्दिक शुभेच्छा
बऱ्याच वर्षांनी पदार्पणाची संधी मिळाली
23 वर्षीय अर्जुन गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. 2021 च्या लिलावात त्याची निवड झाली पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. 2022 च्या लिलावातही त्याची निवड झाली होती पण गेल्या वर्षी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा रविवारी संपुष्टात आली.