Sachin Tendulkar : 32 वर्षांपूर्वी याच दिवशी क्रिकेटच्या देवाने केली होती ‘ही’ मोठी कामगिरी

WhatsApp Group

Sachin Tendulkar First Test Century Team India : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक शानदार खेळी खेळल्या. पण त्याच्यासाठी 14 ऑगस्टचा दिवस नेहमीच खास असेल. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक बरोबर 32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (14 ऑगस्ट 2022) ठोकले होते. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावत भारतासाठी महत्त्वाची खेळी खेळली. इंग्लंडविरुद्धचा हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात सचिनच्या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली.

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. यादरम्यान, कसोटी मालिकेतील दुसरा सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 519 आणि 320 धावा करत दुसरा डाव घोषित केला. भारताने पहिल्या डावात 432 धावा आणि दुसऱ्या डावात 6 गड्यांच्या मोबदल्यात 343 धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिला.

दुसऱ्या डावात सचिनने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 189 चेंडूत नाबाद 119 धावा केल्या. सचिनच्या खेळीत 17 चौकारांचा समावेश होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि एका टोकाला मजबूत बाजू घेऊन खेळत होता. पण वेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला.