
प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरची Sachin Tendulkar मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा लूक आणि ड्रेसेजही सतत चर्चेत असतात. त्याचवेळी, सचिन तेंडुलकरची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते अशी बातमी येत आहे Sara Tendulkar likely to enter Bollywood.
View this post on Instagram
चित्रपटामध्ये विशेष रुची असलेली सारा लवकरच बॉलिवूड पदार्पण करू शकते असा अंदाज आता एका बॉलिवूड रिपोर्टनं वर्तवला आहे. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. पण 24 वर्षीय साराला ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करण्यात रस आहे.
View this post on Instagram
साराच्या अभिनयाबाबत फारसं कोणाला माहीत नाही कारण याआधी कोणी तिला अभिनय करताना पाहिलेलं नाही. त्यामुळे तिला अभिनय करताना पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याची पुष्टी स्वतः सारानं अद्याप केलेली नाही.
View this post on Instagram