ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या महिला एकेरीत बेलारूसची अरिना सबालेन्का चॅम्पियन बनली आहे. विजेतेपदाच्या लढतीत तिने कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना हिचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. रायबाकिनाने पहिला सेट 6-4 असा जिंकला, त्यानंतर सबालेंकाने जबरदस्त पुनरागमन केले. साबालेंकाने दुसरा सेट 6-3 आणि तिसरा सेट 6-4 असा जिंकला. साबालेंकाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. आता रविवारी पुरुष एकेरीचा अंतिम सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपास यांच्यात होणार आहे.
Your #AO2023 women’s singles champion, @SabalenkaA 🙌@wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AusOpen pic.twitter.com/5ggS5E7JTp
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2023