टीम इंडियाचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत नुकताच रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून मैदानात परतला आहे. मात्र श्रीसंतसाठी हे पुनरागमन चांगले ठरलेले नाही. श्रीसंतने पहिला रणजी सामना खेळल्यानंतर दुसऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना त्याला जबर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे Sreesanth hospitalized. सरावाच्या वेळी श्रीसंतला ही दुखापत झाली आहे. श्रीसंतने आपल्या ट्विटरवरुन एक छायाचित्र शेअर करत ही माहिती दिली आहे.
रणजी ट्रॉफीत Ranji Trophy केरळ संघासाठी यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात खेळताना श्रीसंत मेघालयविरुद्ध दोन बळी मिळवले. आणि फलंदाजी करताना पहिल्या डावात १९ धावा आपल्या नावावर केल्यात.
— Sreesanth (@sreesanth36) March 1, 2022
39 वर्षीय श्रीसंतने आयपीएल 2022 च्या लिलावातही आपले नाव दिले होते, त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. पण यावेळीही एस. श्रीसंतसाठी कोणीही बोली लावली नाही. आयपीएलमध्ये श्रीसंतने आजवर 44 सामने खेळताना 40 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलमध्ये श्रीसंत पंजाब किंग्स, कोची टस्कर्स केरळा आणि राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळला आहे.
श्रीसंत हा 2007 टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयी भारतीय संघाचा महत्वाचा भाग होता. भारतीय संघासाठी श्रीसंतने 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये श्रीसंतच्या नावावर 37.59 च्या सरासरीने 87 बळी आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 75 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट्स श्रीसंतच्या नावावर आहेत.